एल्गार परिषद नेमकं काय? | Elgar Council

पुणे एल्गार परिषदेची पार्श्वभूमी

एल्गार परिषद नेमकं काय? (Elgar Council) हे प्रकरण समजून घेण्यासाठी एल्गार ची वादग्रस्त पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ०३ वर्षांपूर्वी ०१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे जी दंगल घडली. या दंगलीत प्रचंड जाळपोळ झाली व  एक तरुणाची हत्या झाली होती. या घटनेचे सामाजिक, राजकीय पडसाद राज्य व देशभरात उमटले होते.

कोरेगाव भीमा २०० वर्ष निमित्ताने  ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान‘ अंतर्गत पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ ला शानिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद आयोजित केली होती. यामध्ये  मुख्यतः कबीर कला मंच सारखे काही संशयास्पद गट व सुधीर ढवळे सारख्या जहाल कम्युनिस्टांनी पुढाकार घेतला होता.

२०१७ च्या वर्षात यांनी राज्यभर सभा, बैठका घेतल्या, जहाल पत्रके, पुस्तिका वितरीत करत तणावाचे वातावरण निर्माण केले होते. एल्गार परिषद घेत अत्यंत चिथावणीखोर, आक्षेपार्ह अशी गाणी, व भाषणे झाली.

‘कोरेगाव भीमा ने दिलाय धडा व नवी पेशवाई मसनात गाडा’… अशा मथळ्याच्या पत्रकाचे व पुस्तिकेचे वितरण केले गेले. उडवा ठिकर्या राई राई रं, गाडून टाका पेशवाई रं… अशी गाणी गायिली गेली. यात जिग्नेश मेवानी ने ‘आता लढाई रस्त्यावर..’ या आशयाचे विधान केले होते.

आयोजक सुधीर ढवळे म्हटला..’अगर जुल्म  हो बगावत होनी चाहिए, और अगर बगावत ना हो तो बेहतर है कि रात ढलने से पहले ये शहर जलकर राख हो जाये’. वितरीत केलेल्या पत्रकात तत्कालीन शासकीय तपास यंत्रणांना नवी पेशवाई ठरवून गाडण्याचे आव्हान केले गेले.

या परिषदेला प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, मौलाना अजहर अली, भीम आर्मी चे विजय रतनसिंग, उमर खालिद, जिग्नेश मेवानी, संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे असे अनेक नेते मंचावर होते, त्यांची भाषणे हि झाली होती.

एल्गार परिषद खटला काय ?

२०० वर्षे निमित्त पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचे (Elgar Council) आयोजक सुधीर ढवळे व कबीर कला मंच च्या कार्यकर्त्यांवर सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी गुन्हा दाखल केला होता. पुढे पुणे पोलिसांनी या गुन्हाच्या आधारे आयोजकांच्या व अन्य संशयितांच्या घरांवर धाडी टाकल्या व त्यातून उपल्बध झालेल्या पुराव्यांआधारे देशभरातून सुधीर ढवळेसह इतर लोकांना प्रतिबंधित माओवादी संघटनेत सक्रिय असल्याच्या आरोपाखाली अटक केली.

पुणे पोलिसा कडील चालू तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) हाती घेतला. आतापर्यंत  या केस मध्ये देशभरातून एकूण १६ जणांना अटक झालेली आहे.

एल्गार परिषद (Elgar Council)

२०१८ चे पुण्याचे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते की, ‘मी छातीठोकपणे सांगतो की, एल्गार परिषदेला प्रतिबंधित माओवादी पक्षाकडून फंडिंग झाले’. तसेच या कम्युनिस्ट कॉम्रेडस नी एकमेकांना पाठवलेले २०० पेक्षा जास्त पत्र पुरावे म्हणून पुढे आले आहेत.

अटक झालेले कॉम्रेडस लोक जामिनासाठी अर्जावर-अर्ज करत आहेत मात्र सर्वच स्तरावर न्यायालयांनी यांचे जामीन नाकारून उलट गंभीर निरीक्षणे नोंदवलेली आहेत. ही केस एल्गार परिषद (Elgar Council) केस म्हणून उल्लेखली जाते.

अधिक वाचा

मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की एल्गार परिषद नेमकं काय? (Elgar Council) याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी मराठी किडा Visit करा .

नमस्कार मित्रांनो, मराठी किडा या आपल्या पोर्टल वर आम्ही आपल्याला ऐतिहासिक, शैक्षणिक, शासकीय तसेच महान वक्तीचा विकासाची यशोगाथा या विषयी संपूर्ण माहिती या वेबसाईट वर देत आहोत.

6 thoughts on “एल्गार परिषद नेमकं काय? | Elgar Council”

Leave a Reply

error: Content is protected !!